किड
नियंत्रणाकरिता क्रॉपसॅप प्रकल्प
क्रॉपसॅप
प्रकल्पामुळे राज्यातील शेतक-यांना विविध पिकांतील कीड व रोगांचे व्यवस्थापन
करण्यातांना निश्चितच मोठा फायदा झाला असुन हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या
कृषि विभाग व कृषि विद्यापीठे यांचा एक महत्वकांक्षी प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर
देशासाठी मार्गदर्शक ठरत आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात
प्रकल्प राबविल्या जात आहे. सदर प्रकल्पाचे सर्वेक्षण अहवाल मोबाईल ॲपव्दारे एनआयसी
पुणे व कृषी विद्यापीठास सादर केला जाते. जिल्ह्यात 22 किड सर्वेक्षक काम करीत असून
त्यांच्यावर संनियंत्रण उपविभाग स्तरावरून श्री. बोथीकर के. एच. व खंदारे एम. पी. कृषी
पर्यवेक्षक करत असून सद्या कापूस व तुर पिकाचे सर्वेक्षण केल्या जात आहे. सर्वेक्षण
अहवालाव्दारे विद्यापीठाकडून प्राप्त Advisory सल्ला विविध माध्यमाव्दारे शेतकऱ्यांना
देण्यात येतो.
तुर : उत्पादन वाढीसाठी एकात्मिक किड
व्यवस्थापन मर रोगास बळी न पडणाऱ्या जातीचा वापर करावा. बागायती तुरीचे क्षेत्र
वाढवून उत्पादनात वाढ करावी. तुर पिकावर पाने गुंडाळणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी,
पिसारी पतंग, शेंग ढेकून, पट्टेरे भुंगरे, खोड ढेकून, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव
दिसून येतो.
एकात्मिक किड व्यवस्थापन : शेताच्या
बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीची तणे कोळशी, रानभेंडी ही तणे वेळोवेळी
काढून नष्ट करावीत. पुर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा. पक्षांना
बसण्यासाठी हेक्टरी 50 ते 60 पक्षीथांबे लावावेत जेणेकरून त्यावर बसणारे पक्षी
शेतातील अळ्या वेचून खातील. रासायनिक किटक नाशकांची फवारणी पट्टा पध्दतीने अथवा
खंड पध्दतीने केल्यास परोपजीवी किडीच्या संवर्धनास मदत होते.
तुरीवरील शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण : नुकसानीचा
प्रकार पिकाच्या कळी फुलोऱ्या पासून काढणीपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या
प्रमाणात होतो. परिणामी तुर पिकाची सर्वाधिक नुकसान या किडीमुळे होते. लहान अळी
सुरूवातीस तुरीची कोवळी पाने खाते. फुलोरा लागल्यावर प्रथम व व्दितीय अवस्थेतील
अळ्यांचा प्रादुर्भाव कळी व फुलावर होतो. नंतरच्या अवस्थेत शेंगावर होतो. त्या
शेंगा भरतांना शेंगावरील कोवळी दाने खातात. एक अळी साधारणत: 20 ते 25 शेंगाचे
नुकसान करते. प्रतिझाड एक अळी असल्यास उत्पादनात हेक्टरी 138 किलो इतकी घट होते.
किडीची आर्थिक नुकसान पातळी : 10 अळ्या प्रती
10 झाडे फुलोऱ्याच्या अवस्थेत किंवा 2 ते 3 अंडी प्रती झाड किंवा 5 टक्के शेंगाचे
नुकसान.
कापूस : कपाशीवरील पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी
बायोफेनथ्रीन 10 ईसी 16 मी. ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गुलाबी बोंड
अळीच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन 10 ईसी 10 मी. ली. प्रती 10 लिटर पाण्यातून
फवारणी करावी. बोंडसड नियंत्रणासाठी कार्बेनडॅझिम 50 डब्ल्युपी 10 ग्रॅम 10 लिटर
पाण्यातून फवारणी करावी. लाल्या नियंत्रणासाठी मॅग्नेशीयम सल्फेट 1 टक्के आणि
युरिया 2 टक्के ची फवारणी करावी. किटकनाशकाच्या मात्रा योग्य प्रमाणात घेऊन फवारणी
करतांना योग्य ती काळजी घ्यावी.
हरभरा : बियाणे जमीनीत पेरणीपूर्व जमीनीतून किंवा
बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाण्याची
उगवणक्षमता वाढविण्यासाठी रोते सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी
जैविक व रासायनिक औषधाची प्रक्रिया करावी त्यासाठी अ) कार्ब्रोक्झीन 75 टक्के
पाण्यात मिसळणारे किंवा कार्बेन्डेझिम 50 टक्के किंवा थायरम 75 टक्के 20 ग्रॅम
प्रती 10 किलो ग्रॅम बियाणे या प्रमाणात चोळून पेरणी करावी. आणि ब) रायझोबीयम आणि
स्फुरद विरघळणारे जिवाणु प्रत्येकी 250 ग्रॅम व ट्रायकोडर्मा 40 ग्रॅम प्रती 10
के. जी. बियाण्यावर बिज प्रक्रिया करावी बियाणे 30 मिनिटे सावलीत सुकवून पेरणी
करावी.
शेतकऱ्यांनी फवारणी करतांना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी
:
शासनाने / कृषी विद्यापीठाने प्रमाणित केलेलेच किटकनाशक फवारणीसाठी स्विकारावेत व
त्यातील फवारणीसबंधीची संपूर्ण माहिती वाचून घ्यावी. किटकनाशकाला हुंगने किंवा
त्याचा वास घेणे टाळावे. फवारणी मिश्रण करतांना अथवा फवारणीच्यावेळी तंबाखु खाणे
अथवा धुम्रपान करणे टाळावे. फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबनाने स्वच्छ धुऊन
खाने पिने करावे. किटकनाशकाच्या रिकाम्या बॉटल / डब्बे वापरानंतर नष्ट करावीत.
किटकनाशके अंगावर पडू नये म्हणून वाऱ्याच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये.
डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपुर्वक लक्ष द्यावे.
जिल्हा माहिती
कार्यालय
हिंगोली
*****
No comments:
Post a Comment