14 November, 2017

अल्पसंख्याक कल्याण समितीमध्ये सदस्याच्या नियुक्तीसाठी अर्ज करावेत

हिंगोली , दि. 14 : अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय , भारत सरकार यांच्या सुधारीत  मार्गदर्शक  सूचनांनुसार मा. पंतप्रधान यांच्या  15  कलमी  कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी  करण्यासाठी  तसेच  राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या  सामाजिक , आर्थिक  व शैक्षणिक  उन्नतीसाठी  तसेच स्थानिक  अल्पसंख्यांक  समस्या  तातडीने  सोडविण्यासाठी  प्रत्येक जिल्हयात जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने  जिल्हास्तरीय  अल्पसंख्यांक  कल्याण समित्या  गठीत  करण्यात येणार आहे . सदर समितीमध्ये  हिंगोली  जिल्ह्यांतर्गत  अल्पसंख्यांकासाठी  काम करणाऱ्या 3 नामवंत अशासकीय स्वयंसेवी  संस्थांचे  प्रति‍निधींनी सदस्य  म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी  जिल्हास्तरावरुन अर्ज/ प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
          हिंगोली  जिल्ह्या करिता गठीत करण्यात येत असलेल्या  जिल्हास्तरीय  अल्पसंख्यांक  कल्याण समितीमध्ये  सदस्य म्हणून  नियुक्ती मिळण्यासाठी  इच्छूक  असलेल्या  नामवंत  अशासकीय  स्वयंसेवी  संस्थांचे  प्रतिनिधींनी. अटी -  संस्थेचे आयुक्त धर्मादाय  किंवा  इतर प्राधिकरण  यांनी प्रदान केलेले नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे धार्मिक / भाषिक अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झालेले प्रमाणपत्र, संस्थेचे घटना व उद्देश, संस्थेचे मागील तीन वर्षाचे जमा खर्चाचे लेखा परिक्षण अहवाल, संबंधित संस्था यांच्या सदस्यांमध्ये कोणतेही न्यायिक वाद नसल्याबाबत रु. 100/- च्या अर्धन्यायिक कोर्ट फी स्टॅम्पपेपरवर नोटराईझ्ड प्रमाणपत्र, संस्थेचे प्रतिनिधी हे हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असणे तसेच इतर कागदपत्रे असणे आवश्यक आहे, कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभुमी नसलेले व्यक्ती असणे आवश्यक आहे, संस्था सामाजिक कल्याणाकरिता सक्रीय असावी.
          वरीलप्रमाणे अटींची पूर्तता करणाऱ्या नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींनी हिंगोली जिल्ह्यातील गठीत करण्यात येत असलेल्या जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती मिळणेसाठी दि. 20 नोव्हेंबर, 2017 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अल्पसंख्याक विभाग, नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे अर्ज व नमुद सर्व कागदपत्रे दाखल करण्याचे जिल्हाधिकारी यांचेकडून करण्यात येत आहे.

*****

No comments: