महात्मा फुले मागासवर्ग
विकास महामंडळ मार्फत विविध व्यवसायाचे
प्रशिक्षण
हिंगोली , दि.16 :- अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील सुशिक्षित
बेरोजगार उमेदवारांना तांत्रिक कौशल्य
प्राप्त करण्याकरिता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध व्यवसायाचे शासनमान्य
संस्थेमार्फत मोफत प्रशिक्षण
देण्यात येते . उदा. संगणक (एमएससीआयटी),
मोबाईल रिपेअरींग, ब्युटीपार्लर , फॅशन डिझाईन , टी.व्ही., रेडिओ , टेप रेकॉर्डर रिपेअर, फॅब्रिकेशन वेल्डींग, ड्रायव्हींग , रेफ्रीजरेशन ए.सी. मोटार
रिवायडींग , पेंटींग ॲटोमोबाईल्स , 2,3,4 व्हीलर इत्यादी व्यवसायाच्या
प्रशिक्षणासाठी सन 2017-2018 या वर्षाकरिता महामंडळाकडून
अर्ज मागविण्यात येत आहेत . अर्जासोबत जातीचा दाखला उत्पनाचा दाखला , रेशन कार्ड
, शैक्षणिक प्रमाणपत्र , शाळा सोडल्याचा दाखला , आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्जासोबत
फोटोसह जोडून महामंडळाचे
जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन रिसाला हिंगोली येथे दिनांक 24 नोव्हेंबर पर्यंत
सादर करणेबाबत जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे .
0000
No comments:
Post a Comment