सन 2015-16 व
2016-17 मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती
अदा करण्यासाठी ई स्कॉलरशिप पोर्टल पुन्हा सुरु करणार
हिंगोली , दि.23 : सामाजिक
न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा निर्वाह भत्ता, विद्यावेतने इत्यादी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18 या
वर्षापासून राज्य शासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या या महाडिबीटी पोर्टल मार्फत अदा करण्याचा
निर्णय घेतला असल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे
https://mahaeschol.maharashtra.gov.in
हे
संकेतस्थळ संस्थागित
करण्यात आलेले आहे .
काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती,
शिक्षण फी,
परीक्षा फी , विद्यावेतने, निर्वाह भत्ता इत्यादी
लाभ देण्याचे प्रलंबित असल्याने तो अदा करण्यासाठी आता ई-स्कॉलरशिप हे संकेतस्थळ
दिनांक 21 नोव्हेंबर, 2017 पासून पुन्हा मर्यादित कालावधीसाठी
सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे .
प्रथम टप्यामध्ये ज्या
विद्यार्थ्यांनी सन 2015-16 साठी दिनांक
31 मार्च 2016 साठी सन 2016-17 करिता दिनांक 31 मार्च 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. परंतू ज्यांना अद्याप
शिष्यवृत्ती शिक्षण फी, परीक्षा फी इत्यादीचा
लाभ मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडे प्रलंबित असलेले अर्ज आणि नुतनीकरण
करावयाचे या कालावधीत संबंधित सहायक आयुक्त,
समाज कल्याण यांच्याकडे पाठवावेत.
याबाबत सविस्तर सूचना असलेले परिपत्रक आणि वेळापत्रक हे विभागाच्या www.sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात
आलेले आहे .
तरी शाळा/ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सादर केलेले सन
2015-16 व 2016-17चे पात्र विद्यार्थ्यांचे
प्रलंबित आणि नुतनीकरणाचे प्रस्ताव
त्वरित सादर करावेत , असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले
आहे.
*****
No comments:
Post a Comment