पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
पुरस्काराकरिता अर्ज करावेत
हिंगोली, दि. 6 : शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल
विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना व स्वयंसेवी संस्थांना
दरवर्षीप्रमाणे यावर्षी महिलांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तसेच स्वयंसेवी
संस्थांना विभागस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन 2017-18 या
वर्षासाठी प्रदान करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
पुरस्काराचे
स्वरूप राज्यस्तरीय पुरस्कार रु. 1 लाख 1 रुपये रोख, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र,
शाल व श्रीफळ, विभागस्तरीय पुरस्कार रु. 25 हजार 1 रुपये रोख, स्मृती चिन्ह,
सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, जिल्हास्तरीय पुरस्कार रु. 10 हजार 1 रुपये रोख, स्मृती
चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात येतील. तसेच केंद्र
शासनामार्फत सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे अशा महिलांच्या
सन्मानार्थ स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे.
तरी हिंगोली जिल्ह्यातील इच्छूक पात्र महिला व स्वयंसेवी
संस्थांनी त्यांचे प्रस्ताव विहीत नमुन्यात दि. 18 नोव्हेंबर, 2017 पर्यंत जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष
क्र. 07 हिंगोली येथे सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्जासाठी व अधिक माहितीसाठी
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व
बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment