जिल्हास्तरीय “एक भारत श्रेष्ठ भारत ”या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन
हिंगोली , दि.16 :- केंद्र शासनाच्या
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय , भारत सरकार अंतर्गत
नेहरु युवा केंद्र, हिंगोली च्या वतीने
जिल्ह्यातील सर्व पाचही तालुक्यात 18 ते 29 वयोगटातील युवक /युवतींसाठी तालुकास्तरीय
खुल्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित
करण्यात येत असून सदर स्पर्धेतून निवड होणारे विजेते
जिल्हास्तरीय स्पर्धेत तर जिल्हास्तरावरील विजेते
राज्यस्तरीय स्पर्धेत आणि राज्यस्तरीय स्पर्धेतील
विजेते राष्ट्रीय स्तरावरील
स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरणार आहेत .
सदर वक्तृत्व स्पर्धा तालुका ते राष्ट्रीय पातळीपर्यंत
असल्याने स्पर्धकांना हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये विषय मांडावा लागणार असून सदर स्पर्धेसाठी एक भारत श्रेष्ठ भारत
हा विषय ठेवण्यात आलेला आहे . आणि प्रत्येक
स्पर्धकास 10 मिनिटे एवढा वेळ
देण्यात येईल . तालुकास्तरीय विजेत्यांना गौरवपत्र तर जिल्हास्तरीय विजेत्यांना अनुक्रमे रोख रु. 5 हजार , दोन हजार , एक हजार व गौरव पत्र
तर राज्यस्तरावर रोख रु. 25 हजार , 10 हजार
, 5 हजार व गौरवपत्र तर राष्ट्रीय पातळीवर रोख रु. 2 लाख , 1 लाख ,
50 हजार व गौरवपत्र अशी पारितोषिके देण्यात
येणार आहेत.
सदर तालुकास्तरीय स्पर्धेत
सहभागी होणाऱ्या व विजेत्या
ठरणाऱ्या स्पर्धकांना जिल्हा , राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत जाण्याची
संधी मिळणार आहे . जिल्हास्तरावर
व राज्यस्तरावर तालुका विजेत्यांशिवाय कोणालाही प्रवेश नसल्याने
तालुकास्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त युवक युवतींनी
आपला सहभाग दि. 16 नोव्हेंबर पर्यंत नोंदवावा व संबंधितांकडून स्पर्धेचे ठिकाण
दिनांक व वेळ आदी माहिती घ्यावी. आपला सहभाग नोंदविण्यासाठी स्पर्धकांनी
तालुकास्तरीय स्पर्धांसाठी खंडूजी भिवाजी वाबळे , कार्तीक शामराव इंगोले, सतीष शंकरराव शिंदे , दुर्गा काशीराम काकडे यांच्याशी
संपर्क साधून स्पर्धेत सहभाग निश्चित
करावा तसेच सर्व सहभागी स्पर्धकांनी आपला पासपोर्ट साईज फोटो, जन्म दाखल्याची
प्रत आणि रहिवाशी प्रमाणपत्रासह स्पर्धास्थळी उपस्थित राहावे.
00000
No comments:
Post a Comment