06 November, 2017

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत
 चर्मोद्योग प्रशिक्षण योजनेचे आयोजन
हिंगोली, दि. 6 :  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचे मार्फत चांभार, ढोर, होलार, मोची या सर्व वर्गातील होतकरू तरुणांसाठी फुरसतगंज, उत्तर प्रदेश येथे दोन महिन्याचे (डिसेंबर ते जानेवारी) प्रशिक्षण योजना आयोजित करण्यात आली आहे.
सदर चर्मोद्योग प्रशिक्षण योजना पुढीलप्रमाणे राबविण्यात येणार आहे. अ) सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन कटींग ऑपरेटर -फुटवेअर, ब) सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन क्लोजिंग ऑपरेटर - फुटवेअर.
सदर प्रशिक्षणासाठी अटी व शर्ती : 1) वय लाभार्थ्यांचे वय 18 ते 35 वर्षे असावे. 2) शैक्षणिक पात्रता – लाभार्थ्यांची शैक्षणिक पात्रता 8 वी पास असावी, 3) आवश्यक कागद : अ) जातीचा दाखला, ब) जन्मतारखेचा दाखला, क) रेशन कार्ड, ड) फोटो आणि ई) आधार कार्ड 4) जिल्हा कार्यालयामार्फत लाभार्थ्यांचे अर्ज वाटप / दाखल करण्याची दि. 13 ते 14 नोव्हेंबर, 2017 या कालावधीपर्यंत. 5) प्रत्येक जिल्ह्यात अर्जाची छाननी करण्याची मुदत दि. 16 ते 17 नोव्हेंबर, 2017 पर्यंत. 6) प्रत्यक्षपणे लाभार्थ्यांची मुलाखत व निवड दि. 20 ते 22 नोव्हेंबर, 2017 पर्यंत.
तरी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात डी. व्ही. भागवतकर मो. 8007951513/7066797309 आणि दु. 02456-221363 संपर्क साधावा.

*****  

No comments: