वृत्त क्र. 558 दिनांक : 29 नोव्हेंबर 2017
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
हिंगोली,दि.29: राज्याचे
युवा धोरण 2012 नुसार युवक कल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून
युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता
तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी
क्रीडा विभाग व अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय
युवा महोत्सवाचे दि. 4 डिसेंबर, 2017 रोजी अहिल्याबाई होळकर कन्या विद्यालय, वसमत येथे सकाळी 11.00 वाजता
आयोजन करण्यात आले आहे.
या युवा महोत्सवात सहभागी
होण्यासाठी कला प्रकार कलाकारांची संख्या खालीलप्रमाणे आहे. लोकनृत्य -20 कलाकार, लोकगीत-10
कलाकार, एकांकिका (इंग्रजी व हिंदी)-12 कलाकार, शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी किंवा
कर्नाटकी) सितार-1, बासरी -1, वीणा-1, तबला-1, मृदंग-1, हार्मोनियम (लाईट)-1, गिटार-1,
शास्त्रीय नृत्य- मणिपुरी-1, ओडीसी-1, भरतनाट्यम-1, कथ्थक-1, कुचीपुडी-1, वक्तृत्व
(हिंदी किंवा इंग्रजी-1 अशा एकूण 56 कलाकार व सहकलाकरांना सहभागी होता येणार असून या
कलाप्रकारामध्ये कला सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे . या महोत्सवात सहभागी होण्यासाठी
जिल्ह्यातील 15 ते 19 वर्षे वयोगटातील युवक-युवती, युवक मंडळे, विद्यालय, महाविद्यालयातील
विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होऊ शकतात. युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्या प्रवेशिका मंडळाच्या, शाळेच्या, कॉलेजच्या लेटरपॅडवर
कलाकारांचे नांव, जन्म तारीख व स्वाक्षरी इत्यादी माहिती भरुन दि. 3 डिसेंबर, 2017 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा, हिंगोली येथे करावेत. यासाठी स्पर्धकांनी
आपल्या जन्मतारखेचा पुरावा सादर करावा, उशिराने आलेल्या प्रवेशिका स्विकारल्या जाणार
नाहीत. प्रत्येक कलाकाराने त्यांना आवश्यक
असणारे वेशभुषा, ड्रेस, साहित्य, वाद्य, मेकअप साहित्य प्रत्येकाने स्वत:चे आणावे.
तसेच सी.डी., कॅसेट्स, डिव्हीडी यावर कला सादर करता येणार नाही. कला सादर करतांना कुठल्याही
प्रकारची इजा दुखापत अथवा गंभीर इजा झाल्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. याची
सर्वस्वी जबाबदारी संघ व्यवस्थापक व कलाकार
यांची राहील. तसेच पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तरी हिंगोली जिल्ह्यातील युवक-युवतींनी या युवक महोत्सवात
सहभागी होऊन आपल्या अंगी असलेली कला गुण सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment