10 November, 2017

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 10 : राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उ. वगळून) मा. श्री. चंद्रकांत पाटील हे दि. 13 नोव्हेंबर, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
सोमवार, दि. 13 नोव्हेंबर, 2017 रोजी दुपारी 12.00 ते 01.30 वाजता परभणी येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 01.45 ते 05.00 वाजता आगमन व सा. बां. हिंगोली येथील कार्यालयात मुख्य अभियंता ते कनिष्ठ अभियंता यांच्यासमवेत खड्डेमुक्त रस्ते अभियान, इमारती व रस्त्यांची प्रलंबित कामे व क्षेत्रीय स्तरावरील कार्य पध्दतीचा अधिक्षक अभियंता, सा. बां. हिंगोली यांच्या कार्यालयात सविस्तर आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 05.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने परभणीकडे प्रयाण.

*****

No comments: