जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश
लागू
हिंगोली, दि. 21
: जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत दिनांक 19 नोव्हेंबर
रोजी स्व. इंदिरा गांधी जयंती संपन्न होणार असून, दिनांक 1 डिसेंबर रोजी ईद-ए- मिलाद
हा मुस्लिम बांधवांचा सण संपन्न होणार आहे. तसेच सध्या गोवा येथे होणाऱ्या फिल्म फेस्टीवलमध्ये दशक्रिया ह्या
चित्रपटाचे प्रदर्शनावरुन ब्राम्हण/ हिंदू धर्मियांच्या भावना उद्विग्न
होत असून त्यावर पैठण येथे निवेदन देऊन
प्रतिक्रीया व्यक्त केलेली आहे. तसेच सध्या देशात बॉलीवूड सिने दिग्दर्शन संजय लीला
भन्साळीच्या पद्मावती चित्रटावरुन मोठा
वाद सुरु असून चित्रपटाविरोधात अनेक हिंदुत्ववादी
संघटनांकडून आंदोलने सुरु असल्यामुळे बॉलीवूड भन्साळीच्या समर्थनार्थ उतरले आहे. तसेच
रामलीला मैदान हिंगोली येथील फेरीवाल्यांच्या प्रश्नांवरुन असंतोषाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव, शेतकऱ्यांना वीज जोडणी, लोडशेडींग अशा वेगवेगळ्या प्रश्नांमुळे
मोर्चे, धरणे, आंदोलने रास्ता रोको अशा विविध प्रकारचे प्रश्न कायदा व सुव्यवस्थेच्या
दृष्टीकोनातून हाताळण्यासाठी जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3)
चे आदेश दि. 18 नोव्हेंबर, 2017 रोजीचे 06.00 वा. पासुन ते दि. 02 डिसेंबर, 2017 रात्रीच्या
24.00 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले
आहे.
आगामी
कालावधीत
साजरे सण-उत्सव, धरणे, मोर्चे, रस्तारोको,
आंदोलनाची शक्यता या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था
कायम रहावी म्हणून अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे
कलम 37
(1) व (3) अन्वये
जिल्ह्यात दि. 18 नोव्हेंबर, 2017 ते दि. 02
डिसेंबर, 2017 रोजीच्या मध्यरात्रीपर्यत आदेश लागू केला आहे. त्यानुसार शासकीय कर्तव्य
पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ
शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास
त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक
पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक
द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप,
विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी
चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत.
व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील याउद्देशाने वाद्य वाजणार नाहीत
किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक
व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास
जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह,
अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या
परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
*****
No comments:
Post a Comment