वृत्त क्र. 560 दिनांक : 30 नोव्हेंबर 2017
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारास मुदतवाढ
हिंगोली,दि.30: महाराष्ट्र
शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित
असून यामध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू , साहसी उपक्रम , दिव्यांग खेळाडूंसह , संघटक /कार्यकर्ते,
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक , महिला मार्गदर्शक व संघटक/कार्यकर्ती यांचेसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच ज्येष्ठ
क्रीडा महर्षीकरीता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
सन 2014-15 , 2015-16 आणि 2016-17 या वर्षासाठी मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील
कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूसह संघटक/कार्यकर्ते, क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक
व संघटक कार्यकर्ती यांचे विहित नमुन्यातील
अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारणीच्या ठरावासह दि. 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्जदाराने आपल्या
कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mumbaidivsports.com वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या
लिंकवर अर्ज सादर करावा असे सूचित करण्यात
आले होते . सदर ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदत वाढ देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज दिनांक 9 डिसेंबर
2017 पर्यंत भरता येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सदर अर्जासोबत 100 प्रमाणपत्राची
मर्यादा रद्द करुन अर्जदाराने सादर केलेल्या सर्व ॲडटमेंट अपलोड करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे
.
तसेच ऑनलाईन अर्जाची एक
प्रत अर्जदाराने जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय , हिंगोली या कार्यालयात
दि. 9 डिसेंबर 2017 पूर्व स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रासह सादर करावी याबाबत
अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा
विभागाच्या संकेत स्थळावर शासन निर्णय
क्रमांक राक्रीधो-2012/प्र.क्र.158/12/क्रीयुसे-02/दि.16 ऑक्टोबर 2017 चे अवलोकन करावे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर
www.maharashtra.gov.in वर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक
क्रमांक 201710161812538321 असा आहे .
तसेच सन 2014-15 या पुरस्कार
वर्षासाठी ज्यांनी अर्ज सादर केलेले होते अशांनी
पुन्हा नवीन शासन निर्णयाच्या नियमावलीनुसार नव्याने अर्ज सादर करावयाचे आहे यांची कृपया नोंद घ्यावी , असे आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी श्री. नरेंद्र पवार यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment