21 November, 2017

जिल्हास्तरीय देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माणया विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन
हिंगोली, दि.21 : केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम  व क्रीडा मंत्रालय , भारत सरकार  अंतर्गत  नेहरु युवा केंद्र, हिंगोली च्या वतीने  18 ते 29 वयोगटातील  युवक / युवतींसाठी  जिल्हास्तरीय  वक्तृत्व  स्पर्धा  शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथे दिनांक 27 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात येत असून सदर स्पर्धेतून निवड होणारे विजेते राज्यस्तरीय स्पर्धेत  आणि राज्यस्तरीय  स्पर्धेतील  विजेते  राष्ट्रीय  स्तरावरील  स्पर्धेत  भाग घेण्यास  पात्र ठरणार आहेत. 
सदर वक्तृत्व स्पर्धा तालुका ते राष्ट्रीय पातळीपर्यंत असल्याने स्पर्धकांना  हिंदी किंवा  इंग्रजी भाषेमध्ये विषय मांडावा लागणार असून  सदर स्पर्धेसाठी एक भारत  श्रेष्ठ भारत  अंतर्गत देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण हा विषय ठेवण्यात  आलेला आहे . आणि प्रत्येक स्पर्धकास  10 मिनिटे  एवढा वेळ  देण्यात येईल . जिल्हास्तरीय  विजेत्यांना अनुक्रमे  रोख रु. 5 हजार , दोन हजार , एक हजार व गौरवपत्र तर राज्यस्तरावर  रोख रु. 25 हजार , 10 हजार , 5 हजार  व गौरवपत्र  तर राष्ट्रीय पातळीवर रोख रु. 2 लाख , 1 लाख, 50 हजार  व गौरवपत्र अशी पारितोषिके  देण्यात  येणार आहेत.
सदर स्पर्धेत केवळ  तालुकास्तरीय विजेत्या  स्पर्धकांनाच सहभाग घेता येईल , जिल्हास्तरावरील  प्रथम विजेत्या  स्पर्धकाला राज्यस्तरीय स्पर्धेत  थेट प्रवेश मिळेल , राज्य पातळी वरील  विजेत्यांना  राष्ट्रीय पातळीपर्यंत जाण्याची संधी मिळणार आहे , असे नेहरु युवा केद्राचे जिल्हा युवा समन्वयक चंदा रावळकर  यांनी कळविले  आहे .

*****

No comments: