निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी
हयात प्रमाणपत्र कोषागारास किंवा
बँकेत सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 1 : जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व निवृत्ती वेतनधारकांनी
व कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र कोषागारास
सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंगोली कोषागार कार्यालयाने सर्व संबंधित बँकांना
अशा निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या याद्या पाठविलेल्या आहे. त्या यादीच्या
नावांसमोर संबंधित निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी स्वाक्षऱ्या कराव्यात,
असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी पी. डी. पुंडगे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले
आहे.
*****
No comments:
Post a Comment