हिंगोली (जिमाका), दि. १२: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.
या अनुषंगाने, जयंती निमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती सुलोचना ढोणे व श्रीमती धनश्री अवचार, तसेच सुरेश पठाडे, नागनाथ नकाते, नितीन खरात, निलेश सुदूलवार, अनिल अवचार, जुबेर पठाण, राजू चरण आणि दोन्ही वसतिगृहातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यात येऊन सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.
****

No comments:
Post a Comment