09 January, 2026
राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध आक्षेप नोंदविण्यास 16 जानेवारीपर्यंत मुदत
हिंगोली (जिमाका), दि. 09 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 28 डिसेंबर, 2025 रोजी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या अधिकृत https://www.mscepune.in/ तसेच https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या उत्तरसूचीबाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नावर आक्षेप असल्यास संबंधितांनी ऑनलाईन स्वरुपात निवेदन सादर करावे, असे परिषदेने कळविले आहे. शाळांसाठी त्यांच्या लॉगिनमधील डॅशबोर्डवर तर पालकांसाठी https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर अंतरिम उत्तरसूची (Interim Answer Key) या हेडिंगखाली स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्रुटी अथवा आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्यासाठी दि. 16 जानेवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आली असून विहित मुदतीनंतर कोणतेही निवेदन स्वीकारले जाणार नाही. तसेच ऑनलाईन पद्धतीशिवाय टपाल, समक्ष अथवा ई-मेलद्वारे प्राप्त होणाऱ्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिक स्वरुपात उत्तर पाठविले जाणार नसून, प्राप्त आक्षेपांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment