09 January, 2026

औंढा नागनाथ संस्थानतर्फे भव्य रील स्पर्धेचे आयोजन — जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 09: औंढा नागनाथ हे भारतातील पहिले व एकमेव भूमिगत ज्योतिर्लिंग असून या पवित्र तीर्थस्थळाचे धार्मिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व देश-विदेशातील भाविकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने औंढा नागनाथ संस्थान यांच्या वतीने “भव्य रील स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमार्फत युवक, सोशल मीडिया क्रिएटर्स तसेच भाविकांना औंढा नागनाथ मंदिराचा गौरव, परंपरा व आध्यात्मिक महत्त्व रील्सच्या माध्यमातून सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून हिंगोली जिल्ह्याची सांस्कृतिक व आध्यात्मिक ओळख अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी, युवकांनी व भाविकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. *****

No comments: