17 March, 2026

सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे गावागावात जनजागृती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय  विभागाच्या  विविध कल्याणकारी  योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती  व जनजागृती होण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी  चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची  जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

हिंगोली  जिल्ह्यातील कानडखेडा खु., कनका, कन्हेरगाव नाका, चिंचोली, राजुरा, इसापूर (रमणा), बळसोंड, केसापूर, नरसी नामदेव, पहेनी, इंचा, हनवतखेडा, राहोली बु., डिग्रस कऱ्हाळे आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****** 





No comments: