हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा वार्षिक योजना
(अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या
विविध कल्याणकारी योजनांची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या
कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक
न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची
जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात
येत आहे.
आज हिंगोली जिल्ह्यातील कोथळज, माळहिवरा, पेडगाव, लिंबाळा, पारडा,
खंडाळा, माळहिवरा, येळी, आडगाव, खरवड, उमरा, वारंगा मसाई आदी गावामध्ये चित्ररथ आणि
भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची
जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास
मदत होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला सामाजिक
न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता
यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत
आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
******
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment