हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शुक्रवार, दि. 20 मार्च 2026 रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह / रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात ग्लोबल पब्लिक इंग्लिश स्कूल हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली तसेच संकल्प जॉब प्लेसमेंट हिंगोली या आस्थापनांचा सहभाग राहणार आहे.
जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी (10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, डी.एड., बी.एड., एम.एड., पदवीधर इ.) आपले शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व बायोडाटासह स्वतः उपस्थित राहावे. हा मेळावा दि. 20 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी कोणतीही प्रवास किंवा इतर खर्चाची भरपाई दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त बा.सु. मरे यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment