छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना वंचित
शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 31 मार्च पर्यंत अर्ज
करण्याचे आवाहन
हिंगांली,दि.14: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्ज माफीसाठी 31 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे
आवाहन महाराष्ट्र शासनाचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 या योजनेअंतर्गत
यापूर्वीच्या विहीत कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन
पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करुन योजनेचे लाभ देण्यास शासनाने मान्यता
दिली आहे. यानुसार सदरचे वंचित शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचा कालावधी दि.
1 मार्च ते दि. 31 मार्च, 2018 असा असणार आहे. मात्र यापूर्वी या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना
पुन्हा अर्ज करता येणार नाहीत.
सदर कालावधीत आपले सरकार सेवा
केंद्रामार्फत शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता
येतील , शेतकऱ्यांसाठी स्वत: किंवा आपले सरकार
सेवा केंद्रामार्फत माहिती भरुन ऑनलाईन अर्ज
भरण्याची सेवा नि:शुल्क आहे, सदर अर्ज करणाऱ्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील इतर
सदस्यांचे प्रमाणीकरण आधार क्रमांकाच्या आधारे बायोमॅट्रीक पध्दतीने किंवा
ओटीपीद्वारे केल्यानंतरच संबंधित अर्ज संपूर्ण माहितीसह अपलोड करण्यात येतील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या
www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक
क्रमांक 201802281949524602 असा आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेअंतर्गत दि. 31 मार्च, 2018 पर्यंत शेतकरी बांधवांनी ऑनलाईन
अर्ज भरण्याचे आवाहन सुधीर मैत्रेवार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे
.
0000
No comments:
Post a Comment