जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत
जल व मृदसंधारणाच्या
कामांसाठी यंत्रसामग्री व्याज
अर्थसाह्य योजना
हिंगोली,दि.15: राज्यातील जलयुक्त शिवार
अभियान/जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृध्दी
यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय योजना
सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने दिनांक 2 जानेवारी 2018 रोजी घेतला आहे. या निर्णयान्वये राज्यात जलयुक्त शिवार अभियान
/ जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी सुशिक्षित
बेरोजगार तरुण / शेतकरी उत्पादक संस्था/ नोंदणीकृत शेतकरी गटास / सुशिक्षित बेरोजगारांच्या सहकारी संस्था
विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना
आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांना उत्खनन यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी
वित्तीय संस्थांकडून कमाल कर्ज मर्यादा
रुपये 17.60 लाख उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या कर्जावरील 5 वर्षांच्या 5.90 लाख रुपये व्याजाचे
दायित्व शासनातर्फे अदा करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यात
एकूण 241 अर्ज प्राप्त झाले होते .
महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभागाचे शासन निर्णय दिनांक 5 मार्च 2018 अन्वये दिलेल्या
निकषा प्रमाणे प्रथम टप्प्यामध्ये या
योजनेत प्राप्त 241 अर्जाची समिती मार्फत छाननी करुन
143 अर्जदारांची शिफारस करण्यात आली होती . या शिफारस केल्यापैकी 120 सुशिक्षित बेरोजगार
अर्जदाराची यादी महाऑन लाईनवर प्रसिध्द
करण्यात आली आहे . सदरील यादी जिल्हा
उपनिबंधक , सहकारी संस्था , हिंगोली
कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे . हिंगोली जिल्ह्यासाठी
50 लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे . सदर योजनेसाठी सध्या नोटीस
बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेल्या अर्जांच्या बाबतीत दिनांक 5 मार्च 2018 च्या शासन निर्णयातील
निकषाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे .
पात्र अर्जदारांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचेकडील अधिकृत
परवानाधारक असलेल्या जिल्ह्यातील वित्तीय
संस्थेकडून सदर योजनेअंतर्गत शासन निर्णयाप्रमाणे विनाअट
कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या लॉग इन
आयडीद्वारे दिनांक 23 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन
सादर करावे , कर्ज मंजुरी पत्रामध्ये शासनाचे दायित्व , शासनाकडून अनुज्ञेय असलेल्या व्याजाच्या परताव्याच्या रक्कमेकरीता कर्जाच्या
रकमेची कमाल मर्यादा रु. 17.60 लाख राहील व त्यानुसार
5 वर्षांमध्ये शासनामार्फत कमाल व्याज
परतावा रक्कम रु. 5.90 लक्ष पर्यंत
राहील , अशी अट वित्तीय संस्थेस मान्य असल्याचे स्पष्ट नमूद असावे , ज्यांनी बँकेचे
पत्र अपलोड केले आहेत त्यांची समितीमार्फत छाननी नंतर जिल्ह्यातील लक्षांकापेक्षा अधिक अर्जदारांनी वित्तीय संस्थेचा कर्ज मंजुरीचा
दाखला सादर केल्यास जिल्हास्तरीय
समितीद्वारे जाहीर सोडत काढून लॉटरी पध्दतीने लाभार्थी
निवड होईल असे जिल्हा उपनिबंधक यांनी कळविले आहे .
00000
वृत्त क्र.75
राष्ट्रीय
युवा स्वयंसेवक या पदासाठी मुदतवाढ
हिंगांली,दि.15:राष्ट्रीय युवा स्वयंसेवक
या पदासाठी दिनांक 13 मार्च पर्यंत
अर्ज मागविण्यात आले होते . परंतू या पदासाठी
दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे . तरी www.nyks.org या संकेतस्थळावर जाऊन माहिती
अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा युवा समन्वयक चंदा रावळकर यांनी केले आहे .
00000
No comments:
Post a Comment