हिंगोली जिल्हा ‘सोशल मिडिया महामित्र’ संवाद सत्र
संपन्न
हिंगोली,दि.8: सोशल मिडिया महामित्र उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील
हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तीन क्षेत्रातील एकुण 820 सोशल मिडिया महामित्र सहभागी
झाले होते. या पैकी तीस महामित्रांना संवाद चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. या
संवाद चर्चेकरीता समाज माध्यमाच्या अनुषंगाने ठरविण्यात आलेले विषय देण्यात आले. या
संवादचर्चेतून तीन महामित्रांची निवड करण्यात आली.
या संवादचर्चेसाठी परिक्षक म्हणुन जिल्हा
परषिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, उपजिल्हाधिकारी, (सामान्य प्रशासन)
पी. एस. बोरगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, प्रा. ए. आर. शास्त्री, प्रा. सुरेंद्र साहू, प्रा. ए. एस. पांपटवार यांनी
तर अनुलोमचे शिवाजी पातळे, सुदाम गवळी आणि शंकर सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी
यांनी सर्व मान्यवरांचे तसेच संवादचर्चेकरीता सहभागी झालेल्या महामित्रांचे स्वागत
केले. संवाद चर्चेत सहभागी झालेल्या सर्व महामित्रांना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र
वार्षिकी-2017 ग्रंथ आणि सन्मानपत्र वितरीत करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment