जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पिण्याचे पाणी
पुरवठा करण्यासाठी निविदा सादर करणेकरीता मुदतवाढ
हिंगोली,दि.21: जिल्ह्यातील ग्रामीण/नागरी
भागातील टंचाईग्रस्त गाव/वाड्या/तांड्यांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करणेकरीता
यापुर्वी ई-निविदा सादर करणेबाबत प्रसिध्दी करण्यात आली होती. परंतू त्यानुसार अद्यापपर्यंत
एकही निविदा प्राप्त झाली नसल्याने सदर कामाकरीता दि. 27 मार्च 2018 रोजी दूपारी
12 वाजेपर्यंत ई-निविदा सादर करण्याकरीता मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर निविदा या http://mahatenders.gov.in व www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छूकांनी सदर
कामाकरीता दि. 27 मार्च 2018 रोजी दूपारी 12 वाजेपर्यंत आपल्या ई-निविदा सादर कराव्यात
असे जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment