महिला आर्थिक विकास महामंडळमार्फत
जागतिक महिला दिनानिमित्त
मुद्रा बँक योजना मेळावा संपन्न
हिंगोली,दि.09: जिल्हास्तरीय
मुद्रा बँक योजना समन्वय समिती आणि महिला आर्थिक विकास
महामंडळ, यांच्या
संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिम्मित मुद्रा बँक योजनेचा मेळावा व
तेजस्विनी संमेलन सोहळा महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय येथे संपन्न झाला.
महिला आर्थिक विकास महामंडळ, हे ग्रामीण व शहरी भागात काम
करीत असुन माविमद्वारे महिलांचे बचत गट स्थापन करणे, महिलांचे
सक्षमीकरण, गटातील महिलांना बँक कर्ज मिळवून देणे,
विविध व्यवसाय उभारण्यास मदत करणे, बचत
गटातील महिलांचे जीवनमान उंचविण्याचे कार्य करीत
आहे. या कार्यक्रमास शहरी व ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्यंने
सहभागी झाल्या होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटातील
महिलां, पशुसखी, प्रेरक,
cmrc व्यवस्थापक, उद्योजक महिला, सहयोगिनी, यांना यावेळी प्रमाण पत्र देऊन
सन्मानित करण्यात आले आले.
यावेळी
- अतिरिक्त जिल्हाधिकारी जे. जी. मिणियार,
उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश वाघ, प्रकल्प अधिकारी एमसीईडीचे
प्रसंन्न रत्नपारखी, आय.डी.बी.आय.बँकचे कल्याण वि. कदम,
आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक आश्रू भोसले, विभागीय
व्यवस्थापक मस्के पंडित,
सहाय्यक प्रकल्प अधिकारी नगर परिषद अनिल इंगोले,
सुकाणू समिती, उपाध्यक्षा श्रीमती रेणुका ढगे, माजी मानव विकास अधिकारी राऊत आणि माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी
श्रीमती संगीता भोंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
श्री मिनियार म्हणाले की, यांनी महिलांनी चूल व मूल या मधेच गुंतून न राहता इतरही क्षेत्रात
प्रगती करावी शासनाच्या अनेक योजना महिलां करिता कार्यान्वित असुन त्याचा लाभ
घ्यावा. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजने
अंतर्गत विनातारण कर्ज मिळण्याची सुविध प्राप्त झाली असून महिलांनी या योजने
अंतर्गत कर्ज करुन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा.
यावेळी
गणेश वाघ यांनी महिला व बालविकास विभागाच्या योजनांची माहिती दिली. तर एमसीईडीचे
रत्नपारखी यांनी व्यवसाय व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. श्री. राऊत यांनी उद्योग
संधी व व्यवसाय कोशल्य यावर मार्गदर्शन केले. श्री. कल्याण कदम यांनी मुद्रा
योजनेची सविस्तर माहिती देऊन या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा असे यावेळी आवाहन केले. श्री. श्रीराम वाघमारे यांनी
नाब्फिंस च्या कर्ज प्रस्ताव , परतफेड, नियमावली याबद्दल माहिती दिली. श्री
भोसले सर यांनी आयसीआयसीआय बँक कर्ज व परतफेड विषयी माहिती दिली. 00000
No comments:
Post a Comment