कोषागार आणि उपकोषागार कार्यालय 31 मार्च रोजी
रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरु राहणार
हिंगोली,दि.23: महाराष्ट्र कोषागार नियम
1968 खंड 1 मधील नियम क्रमांक 409 अन्वये प्राप्त
प्राधिकारानुसार दिनांक 31 मार्च 2018 रोजी शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीने
सदर दिवशी स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या शाखा हिंगोली , वसमत , कळमनुरी , सेनगाव
व स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र शाखा औंढा ना. आणि जिल्हा कोषागार कार्यालय , हिंगोली तसेच बँकींग
उपकोषागारे वसमत, कळमनुरी, सेनगाव व
औंढा ना. दिनांक 31 मार्च 2018 रोजी उशिरापर्यंत रात्री 23.00 वाजेपर्यंत शासनाचे रोखीचे
व्यवहार पूर्ण करण्यासाठी चालू ठेवावीत, असे जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी
कळविले आहे .
00000
No comments:
Post a Comment