31 May, 2019

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू


जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

        हिंगोली,दि.31: जिल्ह्यात सर्व पो.स्टे. हद्दीमध्ये दिनांक 5 जून रोजी मुस्लीम बांधवातर्फे ईद हा सण साजरा होणार आहे. ईदनिमित्त मुस्लीम बांधव ईदगाह मैदान नमाज पठन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र जमतात. दिनांक 1 जून  पासून  ईदनिमित्त  मुस्लीम बांधव व महिला, मुले खरेदीसाठी बाहेर पडतात. प्रत्येक पो.स्टे. हद्दीमध्ये  मोठ्या प्रमाणामध्ये दुकाने लागली जातात त्यामुळे  सर्व ठिकाणी गर्दी होते. दिनांक 6 जून रोजी महाराणा प्रताप जयंती साजरी होणार आहे.
            तसेच विविध संघटनेतर्फे हिंगोली जिल्ह्यात पाणीटंचाई, चाराटंचाई यामुळे मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्तारोको, उपोषणे सुरु असून अशा विविध  घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 30 मे  2019 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 12 जून 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****



जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन





जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी  होळकर यांना अभिवादन
                                                                                   
        हिंगोली,दि.31: अहिल्यादेवी होळकर  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
  यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार,  निवासी उप जिल्हाधिकारी  चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) गोविंद रणविरकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) निवृत्ती गायकवाड, खनिकर्म अधिकारी अमोल  कळसकर  यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी ही यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
00000

ग्रामपंचायत सदस्यत्वाच्या 80 रिक्त जागेसाठी 23 जून रोजी पोट निवडणुक होणार


ग्रामपंचायत सदस्यत्वाच्या
80 रिक्त जागेसाठी 23 जून रोजी पोट निवडणुक होणार

            हिंगोली, दि.31:  राज्य निवडणुक आयोगाने हिंगोली तालुका-13, कळमनुरी तालुका-25, औंढा ना. 07, सेनगाव -10 आणि वसमत -25 अशा एकूण 80 ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वाच्या रिक्त पदाच्या   पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे.
            सदरील निवडणुकीची नोटीस दिनांक 22 मे 2019 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. नॉमिनेशन ऑनलाईन स्विकारण्याचा दिनांक 31 मे 6 जून 2019 पर्यंत असून निवडणुकीसाठी मतदान दिनांक 23 जून रोजी तर मतमोजणी 24 जून 2019 रोजी होणार आहे. असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र. ) निवृत्ती गायकवाड यांनी कळविले आहे.
000000

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त जागेसाठी 23 जून रोजी पोट निवडणुक होणार


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या
रिक्त जागेसाठी 23 जून रोजी पोट निवडणुक होणार

            हिंगोली, दि.31:  राज्य निवडणुक आयोगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या  कळमनुरी 01 (गट क्र.13 येहळेगाव ( तु.)) आणि औंढा (ना.) 01 (गट क्र.67 असोल त. लाख )  या दोन रिक्त पदाच्या   पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे.
            सदरील निवडणुकीची प्रारुप मतदार यादी दिनांक 17 मे 2019 रोजी व अंतिम मतदार यादी दिनांक 27 मे 2019 रोजी प्रसिध्द  करण्यात आली आहे.  नॉमिनेशन दिनांक 3 ते 8 जून 2019  पर्यंत दुपारी 3.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येणार असून निवडणुकीसाठी मतदान दिनांक 23 जून 2019 रोजी तर मतमोजणी दिनांक 24 जून 2019 रोजी होणार आहे, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र. ) निवृत्ती गायकवाड यांनी कळविले आहे.
00000

30 May, 2019


प्रशासकीय यंत्रणांनी  प्रत्यक्ष गावांना भेट देवून टंचाईग्रस्त परिस्थितींची माहिती घ्यावी
                                                             - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर


            हिंगोली,दि.30: जिल्ह्यातील ज्या गावांना पाणीटंचाई भासत आहे त्या गावांच्या पाणी पुरवठा करणा-या साठ्यांची संबंधीत प्रशासकीय यंत्रणांनी  प्रत्यक्ष टंचाईग्रस्त गावांना भेट देवून तेथील परिस्थितींची माहिती घ्यावी व टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना सुचवाव्यात. तसेच टंचाई परिस्थितीत सर्व यंत्रणांनी संवेदनशीलरित्या कामे करावी अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित टंचाईसदृश परिस्थिती व इतर योजनांचा आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. एच.पी तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, विभागीय वनअधिकारी केशव वाबळे,  जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. घुबडे,  सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी यांच्यासह सर्व संबंधीत यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेली पाणी टंचाई आणि त्यावर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा श्री. केंद्रेकर यांनी यावेळी घेतला. टंचाई निवारणासाठी सुरु असलेले टँकर, विंधन विहीर अधिग्रहण, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आदी कामांची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी संबंधीत यंत्रणेकडून घेतली.
 जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे. संबंधीत अधिका-यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन येथील परिस्थितीची माहिती घ्यावी व त्याचप्रमाणे ज्या गावांत पाणी टंचाई आहे तेथे भूवैज्ञानिकांचा सल्ला घेवून  दिर्घकालीन उपाय योजावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  
तालुक्यातील तहसिलदार, गट विकास अधिकारी, भूवैज्ञानिक अधिकारी व जलसिंचन विभागाच्या उप कार्यकारी अभियंता यांची एक समिती तयार करुन त्यांनी पाणीपुरवठा वसुली बरोबरच तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा मे महिण्यातील स्थितींचा विचार करुन पाणी उपलब्धतेचे नियोजन करावे अशी सुचना देतांना  टंचाईच्या काळात लोकहिताची कामे करण्याची संधी प्रशासनाकडे आहे. या संकटाला संधी मानून सर्व यंत्रणानी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी ते म्हणाले.  
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांचा समावेश करुन मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता करावी. तसेच गावातील पाणीपुरवठा संदर्भात नवीन योजना सुचवितांना जुन्या पाणीपुरवठा योजनेचा योग्य अभ्यास करुनच नवीन योजनांचा आराखडा तयार करावा. व नागरीकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करतांना जलपुर्नभरणाचे फायदे स्पष्ट करावेत व प्रत्येकांना आपल्या घरातील बोअरचे जलपुर्नभरण करण्यास सांगावे, असेही  यावेळी श्री. केंद्रेकर यांनी सांगितले.
टंचाई सदृश परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिक हे कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतरीत होत आहेत अशा नागरिकांसाठी  रोहयो योजने अंतर्गत कामे उपलब्ध करुन द्यावीत तसेच गाव तलाव, पाझर तलाव, साठवन तलाव, कोल्हापूरी बंधारे आदींची दुरुस्ती आदी कामांचा समावेश असावा.  रोहयो योजनेच्या कामांच्या ठिकाणी अधिका-यांनी स्वत: भेटी द्याव्यात,  असेही विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे कामे चांगल्या प्रकारे करुन रस्त्यांच्या दुतर्फाला झाडे लावावीत तसेच  कृषि विभागांने खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतक-यांची बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्याची लगबग सुरु असते, या कालावधीत शेतकऱ्यांना बी बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देवून त्याबरोबरच जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या.                                ****

28 May, 2019

हिंगोली नगर परिषद मधील प्रभाग क्र. 11 ब येथील रिक्त जागेसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर




हिंगोली नगर परिषद मधील प्रभाग क्र. 11 ब येथील
रिक्त जागेसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर

            हिंगोली, दि.28:  राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचे पत्र क्र. रानिआ/न.प. 2019 प्र.क्र. 4/का-6 दिनांक 24 मे 2019 अन्वये हिंगोली नगर परिषद मधील प्रभाग क्र. 11 ब येथील रिक्त जागेसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. सदर पोट निवडणुक  कार्यक्रमानुसार नगर परिषद हिंगोली येथील प्रभाग क्र. 11 ब क्षेत्रात दिनांक 24 मे 2019 पासून आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचार संहिता पोट निवडणुकीचा निकाल जाहिर होइपर्यंत अंमलात राहील.
निवडणुक कायक्रम
अ.
क्र.
निवडणुकीचा टप्पा
टप्पा सुरु करण्याची संपविण्याची तारीख
1
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुक कार्यक्रम जारी करण्याची तारीख
28 मे 2019 (मंगळवार)
2
नामनिर्देशन पत्र राज्य निवडणुक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलबध असण्याचा कालावधी
30 मे 2019 (गुरुवार ) सकाळी 11.00 ते 6 जून 2019 दुपारी 2.00 पर्यंत
3
वरील नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी
30 मे 2019 (गुरुवार) ते 6 जून 2019 सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 पर्यंत रविवार दिनांक 2 जून 2019 व बुधवार दि.5 जून 2019 या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.
4
नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित  झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक
दि.7 जून 2019 (शुक्रवार) सकाळी 11.00 वाजल्यापासून
5
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपिल नसेल तेथे
दि.13 जून 2019 (गुरुवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत
5 अ
अपील असल्यास
i)वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत, जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल.
ii) निवडणुक निर्णय अधिकारी यांनी अपिलांचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत.
अपिलांचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी
6
निवडणुक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक
उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या  शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी
7
आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक
23 जून 2019 (रविवार) सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत
8
मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक
24 जून 2019 (सोमवार) सकाळी 10.00 वाजल्यापासून
9
महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे
कलम 19 आणि 51 अ, 1 अ (9) मधील तरतुदीनुसार

 सदर आचार संहितेचे सर्वतोपरी पालन होईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे.
00000


24 May, 2019


हिंगोली लोकसभा मतदार संघातून हेमंत पाटील विजयी

हिंगोली, दि.23: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 15-हिंगोली मतदार संघाचा निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला आहे.  या मतदासंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार हेमंत पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांना 5 लाख 86 हजार 312 मते मिळाली आहे.
15-हिंगोली  लोकसभा मतदार संघातून एकुण 28 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. सदर उमेदवार  निहाय निकाल खालील प्रमाणे आहे.
अ.क्र.
उमेदवारांचे नांव
पक्ष
मिळालेली मते
1
डॉ. धनवे दत्ता मारोती
बहुजन समाज पार्टी
5550
2
वानखेडे सुभाषराव बापुराव
इंडियन नॅशनल कॉंग्रेस
308456
3
हेमंत पाटील
शिवसेना
586312
4
अलताफ अहमद
इंडियन युनियन मुस्लीम लीग
6035
5
असदखान महमदखान
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
1431
6
उत्तम भगाजी कांबळे
प्रबुध्द रिपब्लिकन पार्टी
3343
7
उत्तम मारोती धाबे
अखंड हिंद पार्टी
3907
8
मोहन फत्तुसिंग राठोड
वंचित बहुजन आघाडी
174051
9
वर्षा शिवाजीराव देवसरकर
बहुजन मुक्ती पार्टी
3011
10
सुभाष नागोराव वानखेडे
हम भारतीय पार्टी
1384
11
सुभाष परसराम वानखेडे
बहुजन महापार्टी
2375
12
अ.कदीर मस्तान सय्यद
अपक्ष
1847
13
कांबळे त्रिशला मिलिंद
अपक्ष
1661
14
गजानन हरिभाऊ भालेराव
अपक्ष
1917
15
जयवंता विश्वंभर वानोळे
अपक्ष
8122
16
देवजी गंगाराम आसोले
अपक्ष
3031
17
प्रकाश विठ्ठलराव घुन्नर
अपक्ष
1654
18
मकबुल अहेमद अब्दूल हबीब
अपक्ष
2077
19
ॲड. मारोतराव कान्होबाराव हुक्के
अपक्ष
3618
20
वसंत किसन पाईकराव
अपक्ष
1025
21
सुनिल दशरथ इंगोले
अपक्ष
827
22
सुभाष काशिबा वानखेडे
अपक्ष
1300
23
सुभाष मारोती वानखेडे
अपक्ष
984
24
सुभाष विठ्ठल वानखेडे
अपक्ष
1400
25
संतोष मारोती बोइनवाड
अपक्ष
1283
26
पत्रकार प. सत्तार खाँ
अपक्ष
1399
27
संदिप भाऊ निखाते
अपक्ष
1584
28
संदेश रामचंद्र चव्हाण
अपक्ष
23690
एकुण मतदार : 17,33,729,  झालेले मतदान 11,53,274, नोटा - 4,242, बाद मते - 1,251, प्रदत्त मते -2
विजयी उमेदवार : हेमंत पाटील
****