हिंगोली नगर परिषद मधील प्रभाग क्र.
11 ब येथील
रिक्त जागेसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम
जाहिर
हिंगोली, दि.28: राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र
यांचे पत्र क्र. रानिआ/न.प. 2019 प्र.क्र. 4/का-6 दिनांक 24 मे 2019 अन्वये
हिंगोली नगर परिषद मधील प्रभाग क्र. 11 ब येथील रिक्त जागेसाठी पोट निवडणुकीचा
कार्यक्रम जाहिर झालेला आहे. सदर पोट निवडणुक
कार्यक्रमानुसार नगर परिषद हिंगोली येथील प्रभाग क्र. 11 ब क्षेत्रात
दिनांक 24 मे 2019 पासून आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचार संहिता पोट निवडणुकीचा
निकाल जाहिर होइपर्यंत अंमलात राहील.
निवडणुक कायक्रम
अ.
क्र.
|
निवडणुकीचा टप्पा
|
टप्पा सुरु करण्याची संपविण्याची तारीख
|
1
|
जिल्हाधिकाऱ्यांनी
निवडणुक कार्यक्रम जारी करण्याची तारीख
|
28 मे 2019
(मंगळवार)
|
2
|
नामनिर्देशन
पत्र राज्य निवडणुक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलबध
असण्याचा कालावधी
|
30 मे 2019
(गुरुवार ) सकाळी 11.00 ते 6 जून 2019 दुपारी 2.00 पर्यंत
|
3
|
वरील
नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी
|
30 मे 2019
(गुरुवार) ते 6 जून 2019 सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 पर्यंत रविवार दिनांक 2 जून
2019 व बुधवार दि.5 जून 2019 या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात
येणार नाहीत.
|
4
|
नामनिर्देशनपत्राची
छाननी व वैधरित्या नामनिर्देशित
झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक
|
दि.7 जून
2019 (शुक्रवार) सकाळी 11.00 वाजल्यापासून
|
5
|
नामनिर्देशनपत्रे
मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपिल नसेल तेथे
|
दि.13 जून
2019 (गुरुवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत
|
5 अ
|
अपील असल्यास
i)वैधरित्या
नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन
दिवसांच्या आत, जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल.
ii) निवडणुक
निर्णय अधिकारी यांनी अपिलांचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी
प्रयत्न करावेत.
|
अपिलांचा
निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी
|
6
|
निवडणुक
चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी
प्रसिध्द करण्याचा दिनांक
|
उमेदवारी
मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या
दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी
|
7
|
आवश्यक
असल्यास मतदानाचा दिनांक
|
23 जून 2019
(रविवार) सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत
|
8
|
मतमोजणी व
निकाल जाहीर करण्याचा दिनांक
|
24 जून 2019
(सोमवार) सकाळी 10.00 वाजल्यापासून
|
9
|
महाराष्ट्र
शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे
|
कलम 19 आणि
51 अ, 1 अ (9) मधील तरतुदीनुसार
|
सदर आचार संहितेचे सर्वतोपरी पालन होईल याची
संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment