उन्हाळी कराटे व
स्क्वॅश क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
हिंगोली,दि.4: क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच हिंगोली जिल्हा स्पोर्टस
कराटे असोसिएशन, हिंगोली डिस्ट्रीक्ट स्क्वॅश रॅकेट असोसिएशन यांच्या संयुक्त् विद्यमाने कराटे व स्क्वॅश
क्रिडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना
स्वसंरक्षणार्थ तसेच त्यांचे आरोग्य सृदृढ होऊन खेळाची आवड निर्माण करण्याकरिता स्क्वॅश या खेळाची ओळख
निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा
क्रीडा प्रशिक्षण केंद्र, हिंगोली येथे 15 दिवसांचे कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. 5 ते 20 मे 2019 या
कालावधीत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, हिंगोली येथे करण्यात आले आहे. दिनांक
10 ते 30 मे 2019 या कालावधीत स्क्वॅश या
खेळाची प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण शिबीर हे
नि:शुल्क असून कराटे प्रशिक्षण शिबिराचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील शालेय मुले, मुली
व युवक युवतींनी घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले
आहे .
No comments:
Post a Comment