यावेळी
माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी, कैलास लांडगे, अनिल चव्हाण यांनी आचार्य
बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन
केले.
*****
यावेळी
माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी, कैलास लांडगे, अनिल चव्हाण यांनी आचार्य
बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन
केले.
*****
हिंगोली,दि.20: येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आचार्य
बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी
नायब तहसिलदार राजेंद्र जोशी, माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी यांच्यासह विविध
विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या
प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
*****
हिंगोली,दि.19: येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, नायब
तहसिलदार राजेंद्र जोशी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी ही
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन
केले.
*****
हिंगोली, (जिमाका) दि. 18 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक,
विधवांना साई डेंटल क्लिनिक अँड इम्प्लान्ट सेंटर, औंढा नागनाथ यांच्याद्वारे
महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 02 च्या दरम्यान मोफत
दंत समस्या व उपचार करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक,
विधवा यांनी आपले ओळखपत्र घेऊन जाऊन या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****
हिंगोली, (जिमाका) दि. 18 : सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या
हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी दि. 28 एप्रिल ते दि. 21 मे, 2021 या कालावधीत
सोल्जर (जनरल ड्यूटी) , सोल्जर टेक्नीकल व सोल्जर ट्रेडसमॅन या पदासाठी औरंगाबाद
येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या भरतीसाठी सर्वप्रथम आपण www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंद करुन ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करुन
घ्यावे. तसेच अधिक माहितीसाठी मुख्यालय भरती कार्यालय, पुणे यांच्या
020-26360349 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व जास्तीत जास्त उमेदवारांनी
भरतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , हिंगोली यांनी कळविले
आहे.
*****
हिंगोली,
(जिमाका) दि. 18 : हिंगोली जिल्ह्यातील हळदीला निर्यातीसाठी फार मोठा वाव
असून अधिक कुरकुमीन असणाऱ्या निर्यात योग्य व उच्च प्रतीच्या हळदीची निर्मिती
करावी, असे आवाहन विपणन स्पाईस बोर्डाचे संचालक पी.एम.सुरेशकुमार यांनी उद्घाटनपर भाषणात केले.
स्पाईस बोर्ड भारत
सरकार व कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर
यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 फेब्रुवारी 2021 वार मंगळवार रोजी दुपारी 2.00
ते 5.00 या वेळेमध्ये ऑनलाईन स्वरुपात वेबेल्स्, शेकरु, किसान नेट, फेसबुक व युट्यूब
या माध्यमाद्वारे कृषी विज्ञान केंद्रामध्ये राष्ट्रीय हळद खरेदीदार-विक्रेता संमेलन
पार पडले. यावेळी ते बोलत होते.
या ऑनलाईन
संमेलनात मार्गदर्शन करताना परभणी येथील वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार
शिक्षण संचालक डॉ.डी.बी.देवसरकर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये कृषी
विज्ञान केंद्र, तोंडापूर मार्फत शुध्द हळद बियाण्याची निर्मिती करुन शास्त्रशुध्द
लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार करावा, असे सांगितले. मुंबई स्पाईस बोर्डाचे उपसंचालक बी.
एन. झा यांनी हळद पावडर निर्यातीस संधी असून
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपनीने हळद प्रक्रिया
उद्योग गावोगाव स्थापन करुन निर्यात करावे, असे सांगितले. फलोत्पादन कृषी विभागाचे
संचालक श्री. जमदाडे यांनी याप्रसंगी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन विक्रेता
व खरेदीदारांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
तसेच दत्तगुरु
शेतकरी उत्पादक कंपनी कळमनुरीचे गंगाधर श्रृंगारे यांनी उच्च कुरकुमीन असणाऱ्या व
कमी कालावधीत येणाऱ्या हळद वाणांची लागवड करुन उच्च प्रतीचा माल निर्यातदारास
पुरवठा करण्याची हमी दिली. तर वसमत येथील सुर्या शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रल्हाद
बोरगड यांनी शेतकरी गट व कंपनींच्या माध्यमातून सेंद्रीय हळदीचे उत्पादन घेत असून
खरेदीदारांना उच्च प्रतीचा माल वर्षभर पुरविण्याची ग्वाही दिली.
या ऑनलाईन
संमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर मार्गदर्शनामध्ये तोंडापूर कृषी
विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.पी.पी.शेळके यांनी हिंगोली जिल्ह्यातील
हळद उत्पादक शेतकऱ्यांना देशांतर्गत व देशा बाहेरील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी
या संमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले.
या संमेलनाला हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी,
शेतकरी उत्पादक कंपनी, खरेदीदार व निर्यातदार यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.राजेश भालेराव यांनी केले. हा कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिल ओळंबे, प्रा.रोहीणी शिंदे, डॉ. कैलास गिते व ईतर
कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
******
हिंगोली
जिल्ह्यात कोव्हिड-19 लसीकरण
बहुमाध्यम जनजागृती
अभियानास प्रारंभ
हिंगोली, (जिमाका) दि. 17: केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क
ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यावतीने कोव्हिड -19 लसीकण तसेच आत्मनिर्भर
भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान
राज्यभर राबविण्यात येत आहे. आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी हिंगोली जिल्ह्यात
बहुमाध्यम जनजागृती अभियानाची सुरुवात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.
या बहुमाध्यम रथाचे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सुर्यवंशी, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, क्षेत्रीय लोकसंपर्क
ब्युरो नांदेड चे प्रचार अधिकारी माधव जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी अरुण
सुर्यवंशी, सह जिल्हा निबंधक संजय पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून तसेच फित कापून
उद्घाटन केले.
या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर विठ्ठल काटे आणि संच बीड यांच्याद्वारे
गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत , शासनाच्या
विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचार मोहिमेचा मुळ
उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा
आहे. आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे
अमुल्य कार्य या जनजागृती अभियानातून केले
जाणार आहे. तसेच एलईडी डिस्प्ले च्या
माध्यमातूनही संदेश दाखविण्यात येणार आहेत. श्राव्य संदेशाचाही समावेश या चित्ररथात करण्यात
आला आहे.
पुढील दहा दिवस हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, कळमनुरी , वसमत व औंढा
नाथनाथ या तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातून या चित्ररथाच्या
माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचे
नांदेडचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल यांनी केले.
0000