18 February, 2021

माजी सैनिक, विधवा यांना मोफत दंत समस्या व उपचार

 


 

            हिंगोली, (जिमाका) दि. 18 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवांना साई डेंटल क्लिनिक अँड इम्प्लान्ट सेंटर, औंढा नागनाथ यांच्याद्वारे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 02 च्या दरम्यान मोफत दंत समस्या व उपचार करण्यात येणार आहेत.

            जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा यांनी आपले ओळखपत्र घेऊन जाऊन या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: