· 140
रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू
हिंगोली,
(जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात 38 नवीन कोविड-19 रुग्णांचा
अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी
यांनी आज दिली आहे.
आज
प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन
टेस्टद्वारे हिंगोली परिसर 09 व्यक्ती व कळमनुरी परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे
हिंगोली परिसर 22 व्यक्ती, वसमत परिसर 02 व्यक्ती, औंढा परिसर 02 व्यक्ती व
कळमनुरी परिसर 02 व्यक्ती असे एकूण 38 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 03
कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एका कोरोना
बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सद्य:स्थितीत
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी
06 रुग्णांची प्रकृती
गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 01 कोविड-19 रुग्णांची प्रकृती
अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी
एकूण 07 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार
सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3
हजार 954 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 755 रुग्ण बरे झाल्याने त्यांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 140 रुग्णांवर उपचार सुरु
आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 59 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment