हिंगोली,
दि. 12 (जिमाका) : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयांतर्गत कार्यरत
असलेल्या येथील नेहरु युवा क्रेंद्र कार्यालयामार्फत जिल्ह्यातील नोंदणीकृत युवा मंडळ,
महिला मंडळाकडून विशेष जिल्हा युवा पुरस्कार सन 2019-20 च्या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी
दि. 16 फेब्रुवारी, 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्काराचे स्वरुप
25 हजार रुपये व प्रमाणपत्र असे आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या युवा मंडळाचा प्रस्ताव
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे.
यासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,
क्रीडा, आरोग्य, प्रशिक्षण शिबीर, रक्तदान शिबीर, पर्यावरण रक्षक व राष्ट्रीय अशा विविध
विकासात्मक कार्यक्रम राबविणाऱ्या युवा मंडळ, महिला मंडळानी आपला विहित नमुन्यातील
अर्ज दि. 16 फेब्रुवारी, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत नेहरु युवा केंद्र, जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर, नाईकनगर, हिंगोली येथे सादर करावे, असे आवाहन येथील नेहरु युवा क्रेंद्राचे
जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment