25 February, 2021

बालविवाह निर्मूलन कृतीदलाची बैठक संपन्न

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : बालविवाह निर्मूलनासंदर्भात जिल्हा कृती आराखडा तयार करण्यासाठी  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन कृतीदल समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली .

या बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बाल विवाह निर्मूलनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी सर्व संबंधित विभागाला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. तसेच किशोरवयीन मुलींसाठी असणाऱ्या सर्व योजना तपासून त्याची अंमलजबजावणी  जिल्हा कृती दलात करावी. तसेच अल्पवयीन मुलींच्या गर्थधारणेच्या आकड्यावर लक्ष ठेवण्याच्याही संबंधित विभागाला सूचना केल्या. बालविवाह निर्मूलनासाठी  शासन स्तरावरुन प्रत्येक गावात ग्रामसेवकांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आणि अंगणवाडी सेविकांना सहायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. बालविवाह निर्मूलनासाठी त्यांच्यामार्फत काम केले जात आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस युनिसेफचे प्रतिनिधी आणि एसबीसी-3 संस्थापक निशीत कुमार यांनी बाल विवाह निर्मूलनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी युनिसेफ आणि महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत सुचविण्यात आलेल्या सात महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. तसेच पुढील बैठकीत जिल्हा कृती आराखडा तयार करण्याठी मसुदा चर्चेला आणण्याचे ठरले.

या बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी ए.आर. मलदोडे, नगर परिषदेचे राजू असोले, शिक्षण विस्तार अधिकारी एम.के.जुमडे, जिल्हा काजी संघटनेचे ॲड . काजी नईमोद्दीन सलाहोद्दीन ,  एसबीसी -3 चे राज्य समन्वयक पूजा यादव , ॲड . राजेश भूतनर, संदीप कोल्हे, चाईल्ड लाईन, केंद्र समन्वयक, उज्वल पाईकराव, विद्या नागशेट्टीवार, विधी सल्लागार जि.म.बा.वि. कार्यालय तसेच जिल्हा बाल सरंक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

****

No comments: