हिंगोली,
दि. 09 (जिमाका) : विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्था
यांच्या अडी-अडचणीवर चर्चा करुन त्या सोडविण्यासाठी ‘‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग
@’’ हा अभिनव उपक्रम उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री, राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे
प्रधान सचिव, पुणे येथील उच्च शिक्षण विभागाचे संचालक इत्यादी मान्यवर दि. 13
फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठ, नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमात विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व
संस्था यांच्या अडी-अडचणीवर चर्चा करुन त्या सोडविण्यासाठी काही प्रश्न, अडीअडचणी
व उच्च शिक्षणाच्या विकासविषयक सूचना असतील तर त्या jdhe.nanded-mh@gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवाव्यात, असे सहसंचालक (उच्च शिक्षण),
नांदेड विभाग, नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
No comments:
Post a Comment