हिंगोली, दि. 12 (जिमाका) : केंद्र
शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने हंगाम 2020-21 मध्ये दि.
15 फेब्रुवारी, 2021 पासून ऑनलाईन पध्दतीने चना नोंदणी सुरु करण्याच्या सूचना खालील संस्थांना दिलेल्या आहेत.
चना नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, जवळा बाजार,
वसमत, सेनगाव, साखरा हे सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी
नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
हिंगोली केंद्रासाठी प्रगती स्वयंरोजगार सेवा सह.
संस्था , हिंगोली ही संस्था असून त्याचा पत्ता जुने जिल्हा रुग्णालयाच्या समोर,
तोफखाना, हिंगोली असा आहे. या संस्थेवर
केंद्रचालक म्हणून अमोल काकडे हे कामकाज पाहणार असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक
8788487580 असा आहे.
कळमनुरी केंद्रासाठी कयाधु शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ता.
कळमनुरी ही संस्था असून त्याचा पत्ता वारंगा फाटा ता. कळमनुरी असा आहे. या
संस्थेवर केंद्र चालक म्हणून महेंद्र माने हे कामकाज पाहणार असून त्यांचा
भ्रमणध्वनी क्रमांक 9736449383 असा आहे.
जवळा बाजार केंद्रासाठी औंढा ना. तालुका सह. खरेदी विक्री संघ मर्या.
औंढा (ना) ही संस्था असून त्याचा पत्ता जवळा बाजार असा आहे. या संस्थेवर केंद्र
चालक म्हणून कृष्णा हरने हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9175586758 असा आहे.
वसमत केंद्रासाठी वसमत
तालुका सह. खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत ही संस्था असून त्याचा पत्ता खरेदी विक्री
संघ, वसमत असा आहे. यावर केंद्र चालक म्हणून सागर इंगोले हे काम पाहणार आहेत.
त्यांचा भ्रमणध्वनी क्रमाक 8390995294 असा आहे.
सेनगांव केंद्रासाठी श्री. संत भगवानबाबा स्वयंरोजगार
सेवा संस्था कोथळज ही संस्था असून त्याचा पत्ता साई ॲग्रो इंडस्ट्रीज जिनिंग फॅक्ट्री,
तोष्णीवाल कॉलेज समोर, हिंगोली रोड, सेनगाव असा आहे. या केंद्राचे केंद्र चालक
म्हणून संदीप काकडे हे कामकाज पाहणार असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9823252707
असा आहे.
साखरा केंद्रासाठी विजयालक्ष्मी बेरोजगार सह. संस्था मर्या कोळसा ही
संस्था असून त्यांचा पत्ता साखरा ता. सेनगाव जि. हिंगोली असा आहे. यावर केंद्रचालक
म्हणून उमाशंकर माळोदे हे कामकाज पाहणार असून त्यांचा भ्रमणध्वनी
क्रमांक 9657260743 असा आहे.
शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या
ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी सोबत हंगाम 2020-21 मधील पीक पेरा
नोंद असलेला तलाठ्याच्या सही शिक्यानिशीचा ऑनलाईन सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक
झेरॉक्स सोबत आणावे व बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक आय.एफ.एस.सी.
कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये). संबंधित
तालुक्यातील व तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी चना हमीभावाने खरेदी
करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, परभणी/हिंगोली
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****
No comments:
Post a Comment