हिंगोली, दि. 11 (जिमाका) : सन 2021-22 मध्ये
आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने
विविध क्षेत्राशी संबधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
संचालनालय, Sector Skill
Council, विविध औद्यागिक
आस्थापना यांच्या सहकार्याने राज्यात Skill Competition-२१ चे आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील
जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे दि. 1 मार्च, 2021 ते 31 मार्च, 2021 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. तसेच राज्य
विभागीय पातळीची स्पर्धा दि. 1 एप्रिल, 2021 ते 31 एप्रिल, 2021 कालावधीत तर राज्य
पातळी स्पर्धा दि. 1 मे, 2021 ते 10 मे, 2021 या कालावधीत आयोजित
करण्यात येणार आहे. तद्नंतर देश विभागीय पातळी, देश पातळी आणि
आंतरराष्ट्रीय स्पर्धचे आयोजन करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी, 1999 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच एअरक्राफ्ट मेंटेनन्स, मेकाट्रॉनिक्स, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग, मॅन्युफॅक्चरिंग टीम
चॅलेंज, वॉटर टेक्नॉलॉजी, क्लाऊड कंप्यूटिंग आणि सायबर सिक्युरिटी या
क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी, 1996 किंवा
तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. शांघाई (चीन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा
2021 जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित
स्पर्धेकरीता सर्व ITI, Polytechnic Colleges, Technical High schools,
MCVC Bifocal, प्रत्येक
युनिव्हर्सिटी आधिपत्याखालील सर्व अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, शास्त्र शाखेची आणि इतर कनिष्ठ तसेच, महाविद्यालये, तसेच, महाराष्ट्र राज्य
कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना या स्पर्धेत
सहभागी होण्यासाठी जागतिक कौशल्य स्पर्धा 2022 शांघाई (चीन) करिता इच्छुक असणाऱ्या पात्र
उमेदवारांनी https://worldskillsindia.co.in/worldskill/world/ या लिंकवर भेट देवून दि. 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत आपली नाव नोंदणी करावी,
असे आवाहन प्र. सो. खंदारे, सहायक आयुक्त (प्र.), कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment