05 February, 2026

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते जिल्हास्तरीय उत्कृष्ट आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक पुरस्कार वितरण

 





  

हिंगोली, दि. 05 (जिमाका) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते येथील नक्षत्र सभागृहात आज जिल्हास्तरीय उत्कृष्ट आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक पुरस्कार वितरण करण्यात आले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. शंकर तावडे, जिल्हा समूह संघटक अजहर अली आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांशी संवाद साधत गावपातळीवर आरोग्य सेवा देताना प्रामाणिकपणे व स्पर्धात्मक भावनेने काम केल्यास त्याचे निश्चित फळ मिळते, असे सांगून आज मिळालेला सन्मान हा त्यांच्या कार्याची खरी पावती असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले. तसेच हिंगोली तालुका सध्या आकांक्षित तालुक्यात असल्याने येत्या सहा महिन्यांत सकारात्मक प्रयत्न करून तो आकांक्षित यादीतून बाहेर काढण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून धन्वंतरीच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले.

 यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार 

भांडेगाव येथील श्रीमती भाग्यरथा शिवाजी शिखरे यांना 5000 रुपये रोख प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर मासोड येथील श्रीमती मुक्ता शेकुराव खुडे व्दितीय (3000 रुपये), सिद्धार्थनगर येथील श्रीमती आशा गजानन कोरडे तृतीय (2000 रुपये रोख) क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार

पिंपळदरी येथील श्रीमती वंदना गजानन लेकुळे, प्रथम, पिंपळदरी येथील श्रीमती वैशाली गणेश ढगे, द्वितीय तर जवळा बाजार येथील श्रीमती अर्चना बापूराव दिपके तृतीय असा अनुक्रमे तीन, दोन आणि एक हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कुरुंदा येथील श्रीमती निता भारत गायकवाड प्रथम, गिरगाव येथील श्रीमती प्रेमिला गजानन रानखांब द्वितीय तर कुरुंदा येथील श्रीमती भारती रमेश गायकवाड यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

नर्सी येथील श्रीमती प्रणाली प्रल्हाद खिलारे प्रथम, भांडेगाव येथील श्रीमती अनिता अशोक जळके द्वितीय तर नर्सी येथील श्रीमती नीता प्रदीप जयस्वाल यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

डोंगरकडा येथील श्रीमती कविता दयानंद थोरात प्रथम, वाकोडी येथील श्रीमती पद्मिना सोपान पाईकराव द्वितीय तर

आखाडा बाळापूर येथील श्रीमती शोभा गणेश तोरकड तृतीय क्रमांक मिळाला.

साखरा येथीलच श्रीमती सुचिता शामराव पांडे, प्रथम, श्रीमती सीमा रेणुकादास पांडे द्वितीय आणि श्रीमती शारदा राहुल वाघमारे यांनी क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.

जिल्हास्तरीय गट प्रवर्तक पुरस्कार

आखाडा बाळापूर येथील  श्रीमती रेणुका दिवाकर देशपांडे प्रथम क्रमांकाचा, शिरडशहापूर येथील श्रीमती प्रणिता दिलीपराव काळे द्वितीय तर कुरुंदा येथील श्रीमती शांता संजय गायकवाड तृतीय क्रमांकाचा अनुक्रमे अडीच हजार, दीड हजार आणि एक हजार रुपये रोख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे यांनी आशा वर्कर या गावपातळीवरील आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद करून या पुरस्कारामुळे कामाची नवी प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समूल्यांकन अधिकारी अमोल कुलकर्णी, तालुका समूह संघटक बापू सूर्यवंशी,  ओंकार जोशी, मारोती सोलापरे, अशोक चव्हाण व शिवानंद स्वामी यांनी परिश्रम घेतले.

 

******

No comments: