05 February, 2026

डी.एल.एड्. परीक्षा डिसेंबर–2025 चा निकाल जाहीर

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 05 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.एल.एड्. डिसेंबर2025 परीक्षेचे आयोजन दिनांक 9 ते 17 डिसेंबर, 2025 या कालावधीत करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल आज दिनांक 5 फेब्रुवारी, 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता परिषदेच्या www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर  जाहीर करण्यात आला आहे.

परीक्षार्थींना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळणार आहे. तसेच उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणी करण्यासाठी विहित नमुन्यात, विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दिनांक 20 फेब्रुवारी, 2026 अशी राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिली आहे.

 

*****

No comments: