19 February, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी




        हिंगोली (जिमाका), दि. 19 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

            यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक एस. व्ही.जारे, सुनिल मरळे, श्रीमती मनकरना जाधव यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

********

No comments: