लिंबाळा मक्ता परीक्षा केंद्रावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांची पाहणी
* जीवशास्त्राचा पेपर शांततेत पार पडला
हिंगोली (जिमाका), दि. 25 : हिंगोली जिल्ह्यात आज इयत्ता 12 वीच्या जीवशास्त्र विषयाची परीक्षा शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी लिंबाळा मक्ता येथील कै. राधाबाई मुसळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.
परीक्षा केंद्रांवरील शिस्त, व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. परीक्षा गैरप्रकारमुक्त, शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन, शिक्षण विभाग व संबंधित यंत्रणांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्ह्यातील एकूण 40 परीक्षा केंद्रांवर जीवशास्त्र विषयाची परीक्षा पार पडली असून ती कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत झाली. या परीक्षेसाठी नोंदणीकृत 7 हजार 185 विद्यार्थ्यांपैकी 7 हजार 43 विद्यार्थी उपस्थित होते, तर 142 विद्यार्थी अनुपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 98.02 इतकी नोंदविण्यात आली आहे.
इयत्ता 12 वी जीवशास्त्र विषयाचा पेपर जिल्ह्यात शांततापूर्ण, शिस्तबद्ध व सुरळीतरीत्या पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
******


No comments:
Post a Comment