हिंगोली, दि. १६ (जिमाका) : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला असून, त्या अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन येथील कै. शिवाजीराव देशमुख सभागृह येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर तसेच राजुभैय्या नवघरे उपस्थित राहणार आहेत.
या अनुषंगाने दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर करण्यात येणार आहे. तसेच दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवगीत, पोवाडे व गोंधळ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment