- 96.61 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
हिंगोली (जिमाका), दि.
11: हिंगोली जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या वार्षिक परीक्षेंतर्गत आज बुधवार, (दि. 11)
रोजी सकाळच्या सत्रात हिंदी विषयाचा पेपर जिल्ह्यातील एकूण 26 परीक्षा केंद्रांवर शांततेत
व सुरळीत पार पडला.
या परीक्षेसाठी नोंदणीकृत
3 हजार 545 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 425 विद्यार्थी उपस्थित राहिले, तर 120 विद्यार्थी
अनुपस्थित होते. उपस्थितीचे प्रमाण 96.61 टक्के इतके नोंदविण्यात आले.
परीक्षेच्या पारदर्शक व
सुयोग्य आयोजनासाठी विभागीय मंडळाने नियुक्त केलेल्या 5 भरारी पथकांनी जिल्ह्यातील
विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच मुख्य विषयांच्या परीक्षांसाठी
24 संवेदनशील परीक्षा केंद्रांवर श्रेणीवर्ग-1 चे स्वतंत्र भरारी पथक स्थापन करण्यात
आले आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर
आवश्यक तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ने-आण करणाऱ्या
सहाय्यक परीरक्षकांसोबत पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. जिल्ह्यात आजचा हिंदी
विषयाचा पेपर कोणतीही अनुचित घटना न घडता सुरळीतपणे पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून
देण्यात आली.
******
No comments:
Post a Comment