हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे हे दि. 11 ते 13 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
दि. 11 फेब्रुवारी, 2026 रोजी सोयीनुसार परभणी शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने हिंगोली शासकीय विश्रामगृहाकडे रवाना व हिंगोली येथे मुक्काम.
दि. 12 फेब्रुवारी, 2026 रोजी सकाळी 11 वाजता हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषदांचा आढावा घेतील. दुपारी 1 वाजता सामाजिक न्याय विभागाच्या योजनेचा आढावा घेतील. दुपारी 2 वाजता राखीव. दुपारी 2.30 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा, 3 वाजता जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा आढावा. 3.30 वाजता क्रीडा विभागाचा आढावा, 4 वाजता पोलीस विभागाचा आढावा घेतील. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहील.
दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेचा आढावा घेतील. दुपारी 1 वाजता गटविकास अधिकारी यांची आढावा बैठक व दुपारी 2 वाजता राखीव राहील. दुपारी 3 वाजता जलजीवन मिशन योजनेचा आढावा घेतील. 4 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे जिल्ह्यातील नियोजित प्रकरणाच्या सुनावण्या घेतील आणि सोयीनुसार मोटारीने पुणेकडे रवाना होतील.
*****
No comments:
Post a Comment