26 February, 2026

 आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हरभरा (चना) खरेदी सुरु


* जिल्ह्यात 11 खरेदी केंद्र निश्चित



हिंगोली (जिमाका), दि. 26 : हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीनुसार हरभरा (चना) खरेदी योजना जिल्ह्यात सुरु करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व एनसीसीएफ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी दि. 01 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत करण्यात येणार असून, केंद्र शासनाने हरभरा (चना) साठी प्रती क्विंटल 5 हजार 875 रुपये असा आधारभूत दर निश्चित केला आहे.

जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी एकूण 11 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

हजरत नासरगंज बाबा स्वयंसेवी सेवा सहकारी संस्था म. हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र येहळेगाव ता. औंढा नागनाथ येथे आहे. येथे केंद्र चालक शेख गफार शेख अली हे (9881501040) आहेत. औंढा नागनाथ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) या संस्थेचे खरेदी केंद्र जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे आहे. या संस्थेवर  केंद्र चालक कबीर बशीर कुरेशी हे (9767680780) आहेत. श्री संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा या संस्थेचे खरेदी केंद्र कन्हेरगाव ता. जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक अमोल काकडे हे (8007386143) आहेत. विजयलक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था म. कोळसा ता. सेनगाव या संस्थेचे खरेदी केंद्र साखरा ता. सेनगाव येथे आहे. केंद्र चालक उमाशंकर माळोदे हे काम पाहणार आहेत. त्यांना 9403651743 क्रमांकावर संपर्क साधावा.

श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज या संस्थेचे खरेदी केंद्र सेनगाव येथे आहे. केंद्र चालक निलेश पाटील (9881162222) हे असून, वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत या संस्थेचे खरेदी केंद्र वसमत येथे आहे. केंद्र चालक सोपान बोकारे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9834851485 असा आहे. शेतकरी फळे व भाजीपाला खरेदी विक्री प्रक्रिया सहकारी संस्था शिरड शहापूर ता. औंढा नागनाथ या संस्थेचे खरेदी केंद्र भेंडेगाव येथे आहे. केंद्र चालक सुभाष सोनटक्के हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 8788232830 असा आहे. स्वाभिमानी स्वयंरोजगार सेवा सहकारी रिधोरा या संस्थेचे खरेदी केंद्र नर्सी नामदेव येथे आहे. केंद्र भागवत रोडगे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 7499985448 असा आहे. 

श्री बेलेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि.गोरेगाव या संस्थेचे खरेदी केंद्र पुसेगाव येथे आहे. केंद्र चालक माधव गाडे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9423737672 असा आहे. वाबळे ॲन्ड ऑदर फार्मर प्रोड्यूसर कंपनी भांडेगाव ता.जि.हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र उमरा येथे आहे. केंद्र चालक जगन वाबळे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9923847634 असा आहे. अभिमन्यू सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था म. करंजाळा ता.जि.हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र डिग्रसफाटा येथे आहे. केंद्र चालक रामराव कऱ्हाळे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9158648234 असा आहे.

शेतकरी बांधवांनी हरभरा विक्रीसाठी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा सातबारा उतारा व पिकपेरा यांसारखी कागदपत्रे सादर करणे आवश्यक असून, नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पॉस मशीनद्वारे करण्यात येणार आहे.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना देण्यात येईल. त्यानंतरच शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणावा. ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी राबविण्यात येत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

***

No comments: