20 February, 2026

हिंगोली येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन

  

  • ग्रंथोत्सवात कविता सादर करू इच्छिणाऱ्या नवोदित कवींनी नाव नोंदणी करावी
  • ग्रंथविक्री स्टॉलसाठी 26 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी

 

 

हिंगोली(जिमाका), दि. 20 : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय तसेच जिल्हा येथील ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली  येथे दिनांक 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव 2025’चे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्री हा या ग्रंथोत्सवाचा मुख्य उद्देश असून प्रकाशक, ग्रंथविक्रेते व ग्रंथप्रेमी वाचकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांच्या सहभागातून परिसंवाद, काव्यवाचन, व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी व साहित्यिक चळवळीला चालना मिळावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे.

या ग्रंथोत्सवात सन 2025-26 मध्ये राज्य शासन किंवा विविध नामांकित संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. संबंधित साहित्यिकांनी आपली नावे व तपशील कार्यालयात नोंदवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी  कवी  संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कविता सादर करू इच्छिणाऱ्या नवोदित कवींनी आपल्या नावाची नोंदणी कार्यालयात करावी. वेळेच्या मर्यादेनुसार सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

तसेच ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रंथविक्रेते व प्रकाशक यांनी स्टॉल लावण्याबाबत आपली नावे व तपशील कै. रं. रा. बियाणी नुतन साहित्य मंदिर वाचनालय, बियाणी नगर, हिंगोली किंवा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विराज प्लॉट क्र. 45, नेहरू नगर, रिसाला नाका, हिंगोली-431513 संपर्क क्रमांक : 9822657625 या ठिकाणी संपर्क साधून दिनांक 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समिती 2025 मार्फत करण्यात आले आहे.

 

*******

 

No comments: