हिंगोली(जिमाका), दि. 13 : राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी त्यांच्या पथकासह हिंगोली येथे नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह यांना अचानक भेट दिली.
या भेटीदरम्यान विद्यार्थिनींना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत सविस्तर विचारणा करण्यात आली. विद्यार्थिनींनी सकारात्मक दिलेल्या प्रतिक्रिया ऐकून गोरक्ष लोखंडे यांनी सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे तसेच गृहपाल श्रीमती सुलोचना ढोणे यांचे कौतुक केले.
यावेळी सदस्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षण, शिस्त आणि उपलब्ध शासकीय योजनांचा योग्य लाभ घेण्याचे आवाहन केले.
******


No comments:
Post a Comment