हिंगोली (जिमाका), दि. 23 : नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे संत गाडगेबाबा जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वसतिगृह परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.
यावेळी श्रीमती सुलोचना विष्णु ढोणे (गृहपाल) यांच्या मार्गदर्शनाखाली वसतिगृहातील सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
******


No comments:
Post a Comment