हिंगोली (जिमाका), दि. 16 : नवीन मागासवर्गीय
मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे
शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे दामिनी पथकाच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते. या कार्यक्रमात दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती
प्रेमा जगताप, व महिला पोलीस श्रीमती आरती
साळवे यांनी वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी दामिनी पथक विद्यार्थिनींना करत
असलेली मदत, त्या मदतीचा प्रभावीपणे उपयोग करणे, तसेच स्वतः सक्षम व सुरक्षित राहण्याबाबत
सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन कोणत्याही
अडचणीच्या प्रसंगी त्यांना योग्य व तात्काळ मदत मिळावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश
असल्याचे मार्गदर्शनात नमूद केले.
या कार्यक्रमाच्या वेळी गृहपाल सुलोचना
विष्णू ढोणे यांच्यासह वसतिगृहातील कर्मचारी तसेच सुमारे 200 विद्यार्थिनी उपस्थित
होत्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेबाबत
जागरुकता वाढण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
*****

No comments:
Post a Comment