हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हा वार्षिक योजना
(सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत विविध विभागाच्या कल्याणकारी विविध योजनांची जिल्ह्यातील
लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने
आयोजित चित्ररथाला आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा नियोजन
अधिकारी श्रीमती अनिता लव्हारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी
मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात
जाऊन प्रचार-प्रसिध्दी करणार असल्याने नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या
चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्हा वार्षिक योजना
(सर्वसाधारण) अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, मुख्यमंत्री समृद्ध
पंचायतराज अभियान, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा ज्योतीराव
फुले जन आरोग्य योजना, बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा, मुख्यमंत्री बळीराजा
शेत/पाणंद रस्ते योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, अण्णासाहेब पाटील
आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना आदी योजनांचा समावेश आहे.
तसेच नानाजी देशमुख
कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रसते योजना, रेशीम
शेतीला प्रोत्साहन, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री
जनआरोग्य योजना (एकत्रित), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या कल्याणकारी
योजनांवर आधारित तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकाचे देखील मान्यवरांच्या हस्ते
यावेळी विमोचन करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील
सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या
योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक
जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड, जिल्हा
माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, उपसंपादक चंद्रकांत कारभारी, श्रीकांत देशमुख,
मनोहर भारती आदींची उपस्थिती होती.
*****



.jpeg)

.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment