26 February, 2026

हिंद-दी-चादर अभियानातील निबंध व घोषवाक्य स्पर्धेचा निकाल जाहीर


 *शुक्रवारी बक्षीस वितरण समारंभ*


        कोल्हापूर, दि. 26 : विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचार व कार्यावर आधारित निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला स्पर्धकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. विभागीय माहिती कार्यालयाकडे शेकडो प्रवेशिका प्राप्त झाल्या.                            

विद्यार्थी व खुल्या गटामध्ये घेण्यात आलेल्या या निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवार म्हणजे उदया 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता विभागीय माहिती कार्यालय येथे होणार आहे. 

      या निबंध स्पर्धेसाठी खुल्या व विद्यार्थी गटातून मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधून निबंध प्राप्त झाले. तर घोषवाक्य स्पर्धेसाठी खुल्या व विद्यार्थी गटातून मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधून घोषवाक्य प्राप्त झाले.निबंध व घोषवाक्य स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे :- निबंध स्पर्धा (शालेय गट) प्रथम :आरती सागर नाईक ; द्वितीय :चेतना राजेंद्र चव्हाण ; तृतीय :आयेशा इरफान बहेलर तर घोषवाक्य स्पर्धेत : प्रथम : रेहान रियाज बागवान, द्वितीय : इशा निलेश बळते,  तृतीय : अनुष्का संदिप मोरे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले .

           खुला गट ( निबंध स्पर्धा ) प्रथम : दीपक सर्जेराव पाटील ; द्वितीय : अक्षय अरुण नलावडे ; तृतीय :सुनील बा . नातू तर घोषवाक्य स्पर्धा प्रथम : संजय सौंदलगे ; द्वितीय :अनुराधा शरद व्हटकर ; तृतीय : डॉ .राधिका उदय पेंडसे यांनी यश संपादन केले. या दोन्ही गटातून, म्हणजेच निबंध आणि घोषवाक्य स्पर्धेत  सहभागी होणाऱ्या प्रत्येकी तीन स्पर्धकांना उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम उद्या म्हणजे शुक्रवार, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता विभागीय माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये विजेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले .        

****** 




No comments: